Bharat Gogawale : सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाचं आमंत्रण, भरत गोगावले जाणार की नाही? एका वाक्यात म्हणाले…
गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वादामुळे रायगडचं पालकमंत्रिपद स्थगित करण्यात आलं होतं. अशातच अमित शाह हे रायगड दौऱ्यावर असल्याने हा तिढा सुटणार का? याची चर्चा होतांना दिसतेय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथी आणि शिवरायांच्या समाधीच्या नूतनीकरणाच्या शताब्दी सोहळ्यातील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज रायगड किल्ल्यावर हजेरी लावली होती. यानंतर अमित शाह हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जेवण्यासाठी दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. सुनील तटकरे यांच्या घरी अमित शाह यांच्यासाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. रायगडमधील रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथील सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अमित शाह यांच्या पाहुणचारासह महायुतीच्या नेत्यांसाठी देखील सुनील तटकरे यांच्या रायगड येथील निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आलाय. दरम्यान, यासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी देखील जेवणासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र ते स्नेहभोजनाला जाणार नसल्याचे म्हटले आहे.

'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला

ठाकरे बंधूंची युती अन पवार कुटुंबाचं मनोमिलन? शरद पवार स्पष्टच म्हणाले

सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा

वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना
