शरद पवारांच्या जुन्या व्हिडीओतून दादांना उत्तर, लेकीला समान वागणुकीचा 'तो' व्हिडीओ ट्वीट

शरद पवारांच्या जुन्या व्हिडीओतून दादांना उत्तर, लेकीला समान वागणुकीचा ‘तो’ व्हिडीओ ट्वीट

| Updated on: Apr 11, 2024 | 8:27 AM

बारामतीच्या प्रचार सभेतून अजित पवारांनी केलेल्या आरोपांना सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय. शिवतारेंना रात्री-बेरात्री फोन करून उमेदवारी मागे घेऊ नका, असं सांगण्यात आले. ते फोन कॉल मला दाखवल्याचा सनसनाटी दावा अजित पवारांनी केला. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवार यांना आव्हान दिलंय,

अजित पवार यांनी विजय शिवतारेंच्या फोन कॉलचा दाखल देत शरद पवार गटाची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवार यांना आव्हान दिलंय, मला ही कुणाचे कॉल विजय शिवतारेंना गेलेत. हे मला जाणून घ्यायला आवडेल, त्यांची नावं सांगा असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आणि अजित पवार यांना आव्हानच दिलं. बारामतीच्या प्रचार सभेतून अजित पवारांनी केलेल्या आरोपांना सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय. शिवतारेंना रात्री-बेरात्री फोन करून उमेदवारी मागे घेऊ नका, असं सांगण्यात आले. ते फोन कॉल मला दाखवल्याचा सनसनाटी दावा अजित पवारांनी केला. तर दुसरीकडे शरद पवार गटाने अजित पवार यांच्यावर ट्वीट करून प्रत्युत्तर दिलंय. ‘घरातील लेक ही वंशाचाच नाही तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते, असा पुढारलेला विचार आदरणीय शरद पवार साहेबांसारखा द्रष्टा नेताच रुजवू शकतो….’ बघा काय आहे नेमकं शरद पवार गटाचं ट्वीट

Published on: Apr 11, 2024 08:27 AM