लोकांची सेवा सोडून ‘ईडी सरकार’चं सूडाचं राजकारण; सुप्रिया सुळे यांची खोचक टीका
शिंदे सरकार मोदींची भाषणं ऐकत नसावी, असे का म्हणाल्या सुप्रिया सुळे
पहाटेच्या शपथ विधीवरून सध्या राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर भाष्य करणं टाळलं. तर देशासमोर महागाई आणि बेरोजगारी या सारखे अतिशय महत्त्वाचे आव्हान आणि प्रश्न आहे. बजेट सादर होणार आहे, त्यातून सर्वसामान्यांना काय मिळणार आहे? केंद्रातील कॅबिनेट मंत्री नितेश राणे जेव्हा सांगतात जूनमध्ये आर्थिक मंदीचं सावट येणार आहे, त्यामुळे सर्वांनी मिळून देशातील मोठी आव्हानं त्यावर चर्चा केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
आमदार संतोष बांगर हे गेल्या काही दिवसांपासून प्राचार्याला मारहाण केल्याप्रकरणी चांगलेच चर्चेत आहे, यावर विचारणा केली असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे सर्व दुर्दैवी आहे. हे ईडी सरकार प्रशासनात कमी आणि महाराष्ट्राच्या संस्कृत न बसणारी काम करताना दिसतात. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषण ऐकत नसावी, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. कारण मोदी आपल्या भाषणातून नेहमी म्हणतात मी पंतप्रधान नाही तर प्रधान सेवक आहे. मात्र लोकांची सेवा सोडून हे ईडी सरकार सूडाचं राजकारण करत आहे, असे म्हणत राज्य सरकारवर त्यांनी निशाणा साधला आहे.