बारामतीतील मतदानाच्या एक दिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामती लोकसभा मतदारसंघातील ३०० बूथपैकी १५३ बूथ संवेदनशील आहेत. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. योग्य बंदोबस्त आणि गैरप्रकार रोखण्याची यंत्रणा लावा, असं पत्र लिहित सुप्रिया सुळे यांची आयोगाकडे मागणी
उद्या ७ मे रोजी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात ११ जागांवर मतदान पार पडणार आहे. बारामतीत पवार विरूद्ध पवार असा सामना रंगताना दिसणार आहे. तर बारामती लोकसभा मतदारसंघातील ३०० बूथपैकी १५३ बूथ संवेदनशील आहेत. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. योग्य बंदोबस्त आणि गैरप्रकार रोखण्याची यंत्रणा लावा, असं पत्र लिहित सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. बारामती व खडकवासला आणि दौंड व इंदापूर विधानसभा मतदारसंघ हे संवेदनशील म्हणून जाहीर करावे. या दोन्ही मतदारसंघातून मिळत असलेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोणताही गैर किंवा अनुसूचित प्रकार घडल्यास सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागेल, त्यामुळे योग्य बंदोबस्त आणि गैरप्रकार रोखण्याची यंत्रणा लावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.