रमेश बैस यांचं काम मी पाहिलंय, त्यांना शुभेच्छा पण…; रमेश बैस यांचं सुप्रिया सुळेंकडून स्वागत
भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे.यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
पुणे : भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. तर रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देर आये दुरुस्त आये! कोश्यारी यांनी महापुरुषांचा अपमान केला. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी झालं नव्हतं. कोश्यारी यांच्या राजीनाम्याचं मनापासून स्वागत करते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. राज्यात येणारे नवीन राज्यपाल आम्ही एकत्र काम केलं आहे. बैस हे एक सुसंस्कृत व्यक्ती आहेत. त्यांनी तोच सुसंस्कृतपणा इथे महाराष्ट्रात दाखवावा. त्यांचं महाराष्ट्रात मनापासून स्वागत करते. त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर मी त्यांना भेटायला जाणार आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत

‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'

'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली

पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
