NCP Symbol Hearing | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हावर आयोगात सुनावणी, घड्याळ चिन्ह गोठवणार?

NCP Symbol Hearing | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हावर आयोगात सुनावणी, घड्याळ चिन्ह गोठवणार?

| Updated on: Oct 07, 2023 | 11:27 AM

VIDEO | अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावरुन निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी पडली पार, या सुनावणीवेळी स्वत: शरद पवारांनी आवर्जून हजेरी लावली. मात्र, आता अंतिम निकाल येईपर्यंत घड्याळ चिन्हं गोठवलं जाणार का? अशी चर्चा सुरु झालीय. बघा सुनावणीवरील रिपोर्ट

मुंबई, ७ ऑक्टोबर २०२३ | अजित दादांच्या बंडानंतर, राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावरुन निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी झाली. विशेष म्हणजे या सुनावणीवेळी स्वत: शरद पवारांनी आवर्जून हजेरी लावली. मात्र, आता अंतिम निकाल येईपर्यंत घड्याळ चिन्हं गोठवलं जाणार का? अशी चर्चा सुरु झालीय. शरद पवार गटानं, युक्तिवाद करताना निवडणूक आयोगाला विनंती केली की, पक्षाचं घड्याळ चिन्हं गोठवू नका, अंतिम निकाल येईपर्यंत चिन्हं आमच्याकडेच राहू द्या, असं शरद पवार गटानं म्हटलंय. राष्ट्रवादीच्या स्थापनेचं प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्र सादर करत, शरद पवार गटाकडून अॅड. अभिषेक मनू सिंघवींनी युक्तिवाद करताना म्हटलंय की, पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्या बाजूनं, त्यामुळं पक्ष आमचाच आहे. निवडणूक आयोगाला शरद पवारच अध्यक्ष आहेत कळवलं होतं. राष्ट्रवादीवर अजित पवार गट दावा करु शकत नाही. तर अजित पवार गटाकडून अॅड. महेश जेठमलानींनी युक्तिवाद करताना शरद पवारांच्या नियुक्तीवरच आक्षेप घेतला. बघा सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं?

Published on: Oct 07, 2023 11:27 AM