लाडक्या बहिणींनंतर आता भाऊही लाडके… अजितदादांच्या ‘त्या’ जाहिरातीची एकच चर्चा
राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चांगलाच बोलबाला आहे. अशातच राज्यातील लाभार्थी बहिणींना सरकारकडून दोन महिन्यांचे ३ हजार रूपये त्यांच्या थेट बँक खात्यात पाठवण्यात आले आहे. अशातच अजित पवार यांनी नवं ट्वीट केले आहे. सध्या त्याची चर्चा होतेय
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून लाडक्या भावांच्या योजनेची एक जाहीरात ट्वीट करण्यात आली आहे. योजनांची नांदी जशी बहिणींसाठी.. तशीच भावांसाठी सुद्धा… असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. जशा बहिणी तसेच भाऊ.. अजित पवारांसाठी सगळेच लाडके आहेत, अशा आशयाची एक जाहीरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ट्वीट करण्यात आली आहे. दरम्यान ट्वीट द्वारे करण्यात आलेल्या या जाहिरातीतून लाडक्या भावांसाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली आहे. ‘जशा बहिणी, तसेच भाऊ.. या दादासाठी सगळेच लाडके! योजनांची नांदी जशी बहिणींसाठी.. तशीच भावांसाठी सुद्धा..’, असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे. तर यासोबत एक व्हिडीओसुद्धा जोडण्यात आला आहे. तसेच पुढे असेही म्हटले आहे, या योजनांबद्दल कोणतीही अडचण असेल तर माझ्या भावांना विनंती करतो की, आमचा महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाइन क्रमांक – ९८६१७१७१७१ तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या. प्रत्येक उपयुक्त योजनेची माहिती सविस्तर मिळवा. लाभ घ्या, पंखांना बळ द्या!