राष्ट्रवादीच्या शिबीरात टेन्ट बांधून AC ची सोय, कडाक्याच्या उन्हापासून बचावासाठी बघा कशी आहे व्यवस्था?
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यकर्ता शिबीर, उन्हाच्या तडाक्यापासून वाचण्यासाठी विशेष खबरदारी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज मुंबई विभागाचा मेळावा घेण्यात येत आहे. घाटकोपर पूर्व येथील गुरुकुल एज्युकेशन सोसायटीच्या हॉलमध्ये हा मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल 2 हजार हून अधिक कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष राखी जाधव यांनी या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. या मेळाव्याचं उद्घाटन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे तर आज दिवसभरात सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल, जितेंद्र आव्हाड यांसारखे दिग्गज राष्ट्रवादीचे नेते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता राष्ट्रवादीची ही पूर्वतयारी आहे. मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये आता सक्रिय झालेला असल्याचं पाहायला मिळत आहे. या संपूर्ण कार्यकर्ता मेळावा शिबिर मध्ये राष्ट्रवादीचे दिगज नेते कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार आहेत हे देखील पाहणं तितकच महत्त्वाचं ठरणार आहे. तर राज्यात उन्हाचं सावट असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने या उन्हाच्या कडाख्यापासून बचाव करण्यासाठी टेन्ट बांधून AC ची व्यवस्था करण्यात आली आहे.