“अब्दुल सत्तार राजीनामा द्या”, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रस्त्यावर
सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन...
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सत्तार यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रस्त्यावर उतरल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या मंत्रालयावर धडक मोर्चा घेऊन निघाल्या आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार (Abdul Sattar) यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.
Published on: Nov 15, 2022 03:11 PM
Latest Videos

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले

नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर

पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू

पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
