‘दादा म्हणजे बारामती, आमचं देव अन् काळजाचा तुकडा’, बारामतीत उमेदवारीसाठी राडा
अजित पवार यांनी बारामतीमधून आपली उमेदवारी घोषित करावी, यासाठी समर्थकांनी अजित पवार यांची गाडी रोखून जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी बारामतीमधून अजित पवारांच्या नावाची घोषणा केली.
बारामतीला अजित पवार यांच्याशिवाय पर्याय नाही, म्हणून त्यांनी आपली उमेदवारी जाहीर करावी, यासाठी समर्थकांनी अजित पवारांची काल गाडीच अडवली. बारामतीतील एक कार्यक्रम अटपून अजित पवार हे परत निघत असताना त्यांच्या गाडी भोवती कार्यकर्त्यांनी एकच गराडा घातला. जो पर्यंत अजित पवार उमेदारी जाहीर करत नाही तोपर्यंत रस्त्यावरच ठिय्या मांडण्याची भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली. अखेर समर्थकांच्या आग्रहातर अजित पवार गाडी बाहेर आले आणि तुमच्या मनातील उमेदवार देतो, असे म्हणत त्यांना आश्वासन दिलं. बारामतीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत अद्याप सस्पेन्स कायम आहे. यामुळे समर्थकांनी उमेदवार जाहीर करण्याची मागणी लावून धरली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट