VIDEO : Banda Tatya Karadkar यांच्या वादग्रस्त विधानावरुन पुण्यात NCP चं आंदोलन

VIDEO : Banda Tatya Karadkar यांच्या वादग्रस्त विधानावरुन पुण्यात NCP चं आंदोलन

| Updated on: Feb 04, 2022 | 12:23 PM

सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे  यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कीर्तनकार बंडातात्या कराडकर  यांना चांगलंच महागात पडणार असं दिसतंय. राज्य महिला आयोगाने या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून महिलांबाबतचं अशा प्रकारचं वक्तव्य खपवून घेणार नाही असा इशारा दिला होता. यांच्या वादग्रस्त विधानावरुन पुण्यात NCP चं आंदोलन देखील सुरू आहे. 

सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे  यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कीर्तनकार बंडातात्या कराडकर  यांना चांगलंच महागात पडणार असं दिसतंय. राज्य महिला आयोगाने या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून महिलांबाबतचं अशा प्रकारचं वक्तव्य खपवून घेणार नाही असा इशारा दिला होता. यांच्या वादग्रस्त विधानावरुन पुण्यात NCP चं आंदोलन देखील सुरू आहे. तसंच सातारा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून यासंदर्भातला अहवाल दोन दिवसात सादर करावा, असा आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर  यांनी काल दिला होता. त्यानुसार आज सकाळीच बंडातात्या कराडकर यांच्या मठात साताऱ्याचे पोलीस पोहोचल्याची माहिती हाती आली आहे. आता पोलीस बंडातात्यांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.