Special Report | ‘ईडीच्या बापालाही घाबरत नाही’! राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंचं ईडीलाच आव्हान
आपण पुढील परिणामांचा विचार करत नाही मी ईडी आणि इन्कम टॅक्सच्या बापाला घाबरत नसल्याचे आव्हान आमदार शशिकांत शिंदे यांनी कटापूर येथील घेतलेल्या शेतकरी मेळाव्यात केले आहे.
सातारा : भाजपच्या ईडीला पळवून लावणारे आम्ही कार्यकर्ते आहे. जरंडेश्वर कारखान्यावर आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्याला बाबत अजित पवार साहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही शांत बसलो नाहीतर किरीट सोमय्याचा तोतडेपणा सर्व बाहेर काढला असता. आपण पुढील परिणामांचा विचार करत नाही मी ईडी आणि इन्कम टॅक्सच्या बापाला घाबरत नसल्याचे आव्हान आमदार शशिकांत शिंदे यांनी कटापूर येथील घेतलेल्या शेतकरी मेळाव्यात केले आहे. शशिकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा भाजपचे आजही माझ्यावर प्रेम असल्याचे सांगत भाजपने त्यावेळी 100 कोटीची ऑफर दिली होती. त्यावेळेस ते 100 कोटी घेतले असते तर बरे झाले असते पण भाजपला माहित आहे. मी शरद पवार यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही, असे शिंदे म्हणाले.
Latest Videos