Neelam Gorhe | अनाथ, विधवांसाठी पालिकेकडून योजना, नीलम गोऱ्हेंनी केलं नवी मुंबई पालिकेचं कौतुक
कोरोना काळात विधवा झालेल्या महिला आणि अनाथ बालकांना नवी मुंबई महापालिकेकडून मदत करण्यात येत आहे. महापालिकेकडून पीडितांच्या खात्यावर महिन्याला 6 हजार रुपये जमा केले जात आहे. तसंच विधवा महिलांना रोजगारासाठी 1 लाखाची मदतही करण्यात येत आहे. महापालिकेच्या या कार्याचं नीलम गोऱ्हे यांनी कौतुक केलं आहे. अशा प्रकारची योजना अन्य महापालिकांमध्ये राबवण्यासाठी प्रयत्न करु असंही गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी नवी मुंबई महापालिकेत कोरोना आढावा बैठक घेतली. कोरोना काळात विधवा झालेल्या महिला आणि अनाथ बालकांना नवी मुंबई महापालिकेकडून मदत करण्यात येत आहे. महापालिकेकडून पीडितांच्या खात्यावर महिन्याला 6 हजार रुपये जमा केले जात आहे. तसंच विधवा महिलांना रोजगारासाठी 1 लाखाची मदतही करण्यात येत आहे. महापालिकेच्या या कार्याचं नीलम गोऱ्हे यांनी कौतुक केलं आहे. अशा प्रकारची योजना अन्य महापालिकांमध्ये राबवण्यासाठी प्रयत्न करु असंही गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.
Latest Videos