भालाफेकीमध्ये नीरज चोप्राला सुवर्णपदक, देशभरात जल्लोषाचं वातावरण

भालाफेकीमध्ये नीरज चोप्राला सुवर्णपदक, देशभरात जल्लोषाचं वातावरण

| Updated on: Aug 07, 2021 | 7:13 PM

नीरज चोप्रानं सुवर्णपदक मिळवल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात जल्लोषाला सुरुवात झाली. हरियाणाच्या मंत्र्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. हरियाणाच्या मंत्र्यांनी आनंदाच्या भरात डान्स केला. तर, देशात सगळीकडे पेढे वाटून आनंद साजरा करण्यात येत आहे.

नीरजनं भालाफेकमध्ये सुवर्णपदकं मिळवलं असून त्याला संपूर्ण देशानं आशीर्वाद द्यावा, असं नीरज चोप्राचे वडील म्हणाले आहेत. नीरज चोप्राच्या वडिलांशी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी देखील त्यांना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं आहे. नीरजनं पदक मिळवल्यानंतर त्याच्या घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. नीरज चोप्रानं भारताला टोकियो ऑलम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. अभिनव बिंद्रानंतर भारताला तब्बल 13 वर्षानंतर सुवर्णपदक मिळालं आहे. नीरजच्या यशाबद्दल संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय. नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी त्याचं अभिनंदन करत 6 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. नीरज चोप्रानं सुवर्णपदक मिळवल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात जल्लोषाला सुरुवात झाली. हरियाणाच्या मंत्र्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. हरियाणाच्या मंत्र्यांनी आनंदाच्या भरात डान्स केला. तर, देशात सगळीकडे पेढे वाटून आनंद साजरा करण्यात येत आहे.