नाराजीनंतर सेना-भाजप युतीची नवी जाहीरात प्रसिद्ध, काय म्हटले या नव्या जाहिरातीत?
VIDEO | शिवसेनेकडून युतीची नवी जाहिरात आजच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध
मुंबई : राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्वेक्षण झाले. त्या सर्वेक्षणाची जाहिरात शिवसेनेकडून काही वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांना २६.१ टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना २३.२ टक्के पसंतीचा दावा शिवसेनेच्या जाहिरातीतून करण्यात आला आहे. राष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी, महाराष्ट्रात शिंदे सेनेकडून वृत्तपत्रांमध्ये मोठी जाहिरातबाजी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, शिवसेनेच्या जाहिरातीतून नाराजीच्या चर्चाही पाहायला मिळाल्या. मात्र पुन्हा शिवसेनेकडून युतीची नवी जाहिरात आजच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये जनतेचा कौल शिवसेना-भाजप युतीलाच अशा आशयाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये सर्व नेत्यांचे फोटो देखील असून ४९.२ टक्के जनतेचा शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाला आशीर्वाद असे म्हटले आहे.