Mumbai BMC | मुंबई महापालिका 127 वर्षे जुने पूल पाडणार

| Updated on: Sep 09, 2021 | 9:05 AM

मुंबई महानगरपालिकेने शहरातील 127 वर्षे जुने पूल पाडून त्याठिकाणी केबल पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पुलांचे बांधकाम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि रेल्वे करणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. या पुलांचे काम 2022 पासून टप्याटप्याने सुरु करण्यात येणार असून 2025 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

अरुंद रस्ते, वाहनांची वाढती संख्या आणि जीर्ण झाल्यामुळे धोकादायक झालेल्या उड्डाणपुलांमुळे सध्या मुंबईत मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. यावर उतारा म्हणून लवकरच मुंबई महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पातंर्गत मुंबईत केबल आधारित 12 पूल उभारण्यात येतील. हे काम 2025 पर्यंत पूर्ण केले जाणार असून त्यासाठी 1775 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.