अयोध्येतील राम मंदिरावरील राजकारण काही थांबेना, शंकराचार्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राणे अन् ठाकरे आमने-सामने
२२ जानेवारी रोजी होत असलेल्या राम मंदिराच्या लोकार्पणापूर्वीच मोठा वाद निर्माण झालाय. राम मंदिराचं बांधकाम अपूर्ण असतानाच प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा नको, अशी भूमिका शंकराचार्य यांनी घेतल्यानंतर मंत्री नारायण राणे यांनी हिंदुत्वासाठी शंकराचार्य यांचं योगदान काय? असा सवाल केला
मुंबई, १५ जानेवारी २०२४ : मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्य यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतरचा निर्माण झालेला वाद अद्याप शमलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्यानंतर संजय राऊत यांनी नारायण राणेंवर निशाणा साधलाय तर काँग्रेसनेही रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आहे. अयोध्येत २२ जानेवारी रोजी होत असलेल्या राम मंदिराच्या लोकार्पणापूर्वीच मोठा वाद निर्माण झालाय. राम मंदिराचं बांधकाम अपूर्ण असतानाच प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा नको, अशी भूमिका शंकराचार्य यांनी घेतल्यानंतर मंत्री नारायण राणे यांनी हिंदुत्वासाठी शंकराचार्य यांचं योगदान काय? असा सवाल केला आणि वादाला तोंड फुटलं. उत्तराखंडमधील ज्योतिरमठाचे शंकराचार्य यांनी प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा हिंदू धर्मशास्त्रानुसार होत नसल्याचे म्हटलंय, त्यामुळे चारही मठाचे शंकराचार्य या अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नसल्याचे म्हटलंय. यादरम्यान, नारायण राणे यांनी एक प्रतिक्रया दिली आणि वादाला तोंड फुटलं… बघा नेमकं काय म्हणाले नारायण राणे?