“राजकीय व्यासपीठावर नवा जॉनी लिव्हर सापडलाय”; जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंवर टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्यावर काल खोचक टीका केली होती. राज यांच्या या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्यावर काल खोचक टीका केली होती. राज यांच्या या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुमची काल सभा झाली. तुमचं भाषण झालं. लोकांनी टाळ्याही वाजवल्या. पण तुमच्या भाषणावरच्या कमेंट पाहा. लोक प्रतिक्रिया देत नाहीत. स्माईली देत आहेत. लोक तुम्हाला महाराष्ट्राचा जॉनी लिव्हर म्हणत आहेत. राजकीय व्यासपीठावर नवा जॉनी लिव्हर सापडला असं म्हणतात याची मला लाज वाटते. याचं दु:ख होतं, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना शालजोडीतून फटकारे लगावले.
Published on: Apr 13, 2022 01:38 PM
Latest Videos