निवडणुकीच्या तोंडावर मंत्रालयात नवा क्यूआर कोड, स्कॅन करा अन्…; अमोल कोल्हेंची खोचक टीका
अवघ्या दोन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचार सभा, दौरे, रॅली सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर सडकून हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले आहे.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर मंत्रालयात एक नवा क्यूआर कोड आला आहे, असे म्हणत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सडकून टीका केली आहे. मंत्रालयात आलेल्या नव्या क्यूआर कोडला स्कॅन करा, कोड स्कॅन केल्यावर टेंडर घ्या, कमिशन द्या.. असं दिसत असल्याची खोचक टीकाही अमोल कोल्हे यांनी केली आहे. तर मंत्रालयातील ८० टक्के फोन गेल्या ८ दिवसांपासून बंद असल्याचेही अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘मंत्रालयातील ८० टक्के फोन गेल्या ८ दिवसांपासून बंद आहेत’, असे म्हणत अमोल कोल्हे म्हणाले, तुम्ही जर विचारलं तर सांगतील तांत्रिक बिघाड आहे. पुढे ते असेही म्हणाले, खरंतर मंत्रालयात एक नवा क्यू आर कोड आला आहे. क्यू आर कोड स्कॅन केला की त्यावर फक्त येतंय… टेंडर घ्या, कमिशन द्या निवडणूक जवळ आली, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.