कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारची नवी नियमावली; काय सुरू, काय बंद? जाणून घ्या
शनिवारी संध्याकाळी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. ही नियमावली 10 जानेवारीपासून 15 फेब्रुवारीपर्यंत लागू असेल. त्यात राज्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी आदेश लागू केले आहेत. तसंच सरकारी, खासगी कार्यालये आणि विविध आस्थापना, दुकाने, मॉल्स आदींसाठी नवे निर्बंध लागू केले आहेत.
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) अधिक वेगानं वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या (Corona Patients) झपाट्याने वाढतेय. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारनं कठोर निर्बंध (Corona Restrictions) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारकडून (Mahavikas Aghadi) शनिवारी संध्याकाळी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. ही नियमावली 10 जानेवारीपासून 15 फेब्रुवारीपर्यंत लागू असेल. त्यात राज्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी आदेश लागू केले आहेत. तसंच सरकारी, खासगी कार्यालये आणि विविध आस्थापना, दुकाने, मॉल्स आदींसाठी नवे निर्बंध लागू केले आहेत.
Published on: Jan 08, 2022 10:30 PM
Latest Videos