Mumbai Railway on Alert | मुंबई लोकल ट्रेन सुरक्षेचं नवं मॉडेल तयार, सूत्रांची माहिती

Mumbai Railway on Alert | मुंबई लोकल ट्रेन सुरक्षेचं नवं मॉडेल तयार, सूत्रांची माहिती

| Updated on: Sep 16, 2021 | 7:51 AM

मुंबई लोकल ट्रेन सुरक्षेचं नवं मॉडेल तयार, सूत्रांची माहिती. लोकल ट्रेन दहशतवाद्यांच्या निशाण्यावर. त्यामुळे आता सुरक्षेसाठी खास मॉडेल तयार करण्यात येईल. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार.

मुंबई लोकल ट्रेन सुरक्षेचं नवं मॉडेल तयार, सूत्रांची माहिती. लोकल ट्रेन दहशतवाद्यांच्या निशाण्यावर. त्यामुळे आता सुरक्षेसाठी खास मॉडेल तयार करण्यात येईल. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार.

सण-उत्सवांचा कालावधी त्यांच्या निशाण्यावर होता. अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांनी सांगितले, की गर्दी असलेल्या प्रत्येक भागात हल्ला करण्याचे त्यांचे लक्ष्य होते. त्यांनी या संदर्भात अनेक ठिकाणी रेकी केली होती, तर अनेक ठिकाणी त्यांना रेकी करणं बाकी होतं. यामध्ये मुंबईतील वर्दळीची ठिकाणं, लोकल ट्रेन, मोठी मंदिरे, तसेच उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमधील मोठ्या मैदानाचा समावेश असल्याचं बोललं जातं. गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, रामलीला आणि निवडणूक सभा होणाऱ्या मोठ्या मैदानांचा यात समावेश आहे.

47 वर्षीय समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख (Jan Mohammad Shaikh) याने गणपती विसर्जनासाठी महत्त्वाचे ठिकाण असलेल्या दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी, मरिन ड्राईव्ह परिसराची रेकी केली होती. तसेच अनेक वेळा त्याने मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांची तपासणीही केली होती, अशी माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) सूत्रांनी दिली. तो सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता.