महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्या, मगच चर्चा; शिंदे गटाची नवी भूमिका
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्या, मगच चर्चा करू, अशी नवी भूमिका एकनाथ शिंदेंच्या गटाने घेतली आहे.
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्या, मगच चर्चा करू, अशी नवी भूमिका एकनाथ शिंदेंच्या गटाने घेतली आहे. शिवसेना आमदारांचा आग्रह असेल तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीतून बाहेरही पडण्याची आमची तयारी आहे. फक्त आमदारांनी मुंबईत यावं आणि इथे येऊन चर्चा करावी. पुढील 24 तासात आमदारांनी मुंबईत यावं, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे. त्यानंतर शिंदे गटाने ही भूमिका मांडली आहे. शिवसेना पक्ष आणि राज्यातली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेनं उचललेलं हे पाऊल पक्ष पातळीवर एक मोठी तडजोड मानली जातेय.
Published on: Jun 23, 2022 03:57 PM
Latest Videos