‘लाव रे तो VIDEO’, ठाकरे गटाने थेट स्क्रिनवर दाखवली 2013 ची प्रतिनिधी सभा, राहुल नार्वेकरही हजर
शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल नार्वेकरांनी दिला त्या आधारांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद बोलावली. दरम्यान यावेळी ठाकरे गटाकडून थेट लाव रे तो VIDEO असं पाहायला मिळलं. तर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी कायदेशीर कागपत्रांचे पुरावेच यावेळी स्क्रीनच्या माध्यमातून सादर केले.
मुंबई, १६ जानेवारी, २०२४ : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या आधारावर शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल दिला त्या आधारांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद बोलावली. दरम्यान यावेळी ठाकरे गटाकडून थेट लाव रे तो VIDEO असं पाहायला मिळलं. तर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी कायदेशीर कागपत्रांचे पुरावेच यावेळी स्क्रीनच्या माध्यमातून सादर केले. यावेळी अनिल परब यांनी शिवसेनेची 2013च्या प्रतिनिधी सभेचा व्हिडीओच दाखवला. या प्रतिनिधी सभेत स्वत: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उपस्थित होते. यावरुन विधानसभा अध्यक्ष स्वत: त्या बैठकीत होते. बैठकीला असूनही ते कागदपत्र आमच्याकडे आले नाहीत असं ते म्हणाले, असं अनिल परब म्हणाले. अनिल परब यांनी दाखवलेल्या पुराव्यानंतर आता शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट समोर आल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत.