New Year 2025 : नवं वर्ष, नवा उत्साह अन् नवी उमेद… बघा 2025 च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
२०२५ या नव्या वर्षाचा पहिला सूर्यादय झाला अन् तांबूस पिवळा रंगांनी आकाश सजलं. हे नवं वर्ष सर्वांना आनंदाचे भरभराटीचे जावो... या शुभेच्छासह टीव्ही ९ मराठी प्रेक्षकांसाठी हे खास दृश्य...
नवा उत्साह, नव्या उमेदीसह सर्वत्र नव्या वर्षाचं जल्लोषात आणि आनंदात स्वागत होत आहे. २०२५ या नव्या वर्षाचा पहिला सूर्यादय झाला अन् तांबूस पिवळा रंगांनी आकाश सजलं. हे नवं वर्ष सर्वांना आनंदाचे भरभराटीचे जावो… या शुभेच्छासह टीव्ही ९ मराठी प्रेक्षकांसाठी महाराष्ट्रातील रत्नागिरी, आसाममधील गुवाहाटी अन् तमिळनाडू येथील मदुराई येथील हे खास दृश्य… नवीन वर्षाची सुरूवात कोणी सकाळीच मंदिरात जाऊन देवी-देवतांचं दर्शन घेत असतात तर कोणी २०२५ या नवीन वर्षाच्या पहिल्या सूर्योदयाला पाहून त्याचं तेज आपल्या मनात साठवण्यास पसंती देत असतात. दरम्यान, आज सकाळीच महाराष्ट्रातील रत्नागिरी, आसाममधील गुवाहाटी अन् तमिळनाडू येथील मदुराई येथील हे खास दृश्य समोर आली आहेत. नवीन वर्षाचा हा पहिला सुर्योदय पाहण्यासाठी मुंबईमध्येही अनेक मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यावर एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.