IND V/S NZ Match | न्यूझीलंडच्या एजाज पटेलची ऐतिहासिक कामगिरी, भारताचे सर्व खेळाडू तंबूत पाठवले

IND V/S NZ Match | न्यूझीलंडच्या एजाज पटेलची ऐतिहासिक कामगिरी, भारताचे सर्व खेळाडू तंबूत पाठवले

| Updated on: Dec 04, 2021 | 3:11 PM

न्यूझीलंडचा एजाज पटेल हा कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वच्या सर्व 10 बळी घेणारा जगातील तिसरा आणि न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ही कामगिरी केली.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला त्यामुळे पहिले सत्र खेळवता आले नाही त्यानंतर भारताने पहिल्या दिवसअखेर चार विकेट गमावत 221 धावा केल्या होत्या. कालच्या 4 बाद 221 वरुन पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाला एकट्या एजाज पटेलने लोळवलं. काल मयंक अग्रवाल 120 धावांवर नाबाद होता त्याने आज 30 धावांचं योगदान दिलं. मयंक 150 धावांवर असताना एजाजचा बळी ठरला. आज अक्षर पटेलने अर्धशतकी खेळी करत अखेरच्या षटकांमध्ये भारताला 300 पार नेलं. मात्र त्यालादेखील एजाजनेच पायचित केलं.

न्यूझीलंडचा एजाज पटेल हा कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वच्या सर्व 10 बळी घेणारा जगातील तिसरा आणि न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ही कामगिरी केली. त्याच्या आधी इंग्लंडचा जिम लेकर आणि भारताच्या अनिल कुंबळे या दोघांनी ही कामगिरी केली आहे. हे काम जिम लेकरने जुलै 1956 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले होते. त्याचवेळी कांबुळेने हा विक्रम फेब्रुवारी 1999 मध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केला होता. एजाजने या डावात 47.5 षटकं गोलंदाजी केली. यापैकी 12 षटकं त्याने निर्धाव टाकली आणि 119 धावा देत 10 बळी घेतले.