‘मोदींचं भाषण बोअर…शाळेतील गणिताच्या तासाची आठवण’, काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदाराचा टोला
संविधानाच्या ७५ वर्षाच्या गौरवशाली प्रवासावर लोकसभेत काल चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेत काँग्रेसवर आणि पंडित जवाहरलाल नेहरू ते इंदिरा गांधीपर्यंत जोरदार हल्लाबोल केला.
‘नरेंद्र मोदी संसदेत नवीन काही बोलले नाही, त्यांचं भाषण कंटाळवाणं होतं. मला माझ्या शाळेतील गणिताच्या तासाची आठवण झाली’, असं वक्तव्य काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी यांनी केल्याचे पाहायला मिळाले. संविधानाच्या ७५ वर्षाच्या गौरवशाली प्रवासावर लोकसभेत काल चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेत काँग्रेसवर आणि पंडित जवाहरलाल नेहरू ते इंदिरा गांधीपर्यंत जोरदार हल्लाबोल केला. साधारण पावणेदोन तास नरेंद्र मोदी यांचं भाषण चालू होतं. या भाषणावर खासदार प्रियांका गांधी यांनी टीका करत जोरदार निशाणा साधला आहे. माध्यमांशी संवाद साधताना प्रियांका गांधी म्हणाल्या, मोदींनी एकही नवी गोष्ट सांगितली नाही. त्यांच्या भाषणामुळे आम्ही बोअर झालो. खूप दशकानंतर मला असं जाणवलं की शाळेत गणिताचा अतिरिक्त तास असायचा, तशा तासाला मला बसल्यासारखं वाटलं. पुढे त्या अशाही म्हणाल्या, नड्डाही हात चोळत बसले होते. अमित शाह डोक्यावरून हात फिरवत होते. पियूष गोयल यांनाही झोप आल्यासारखे वाटत होते. मला वाटलेलं पंतप्रधान काहीतरी नवीन बोलतील. माक्ष भ्रष्ट्राचारासंदर्भात शून्य सहिष्णूता असल्याचे म्हणत प्रियांका गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल केलाय.