Video | प्रदीप शर्माला एनआयएकडून अटक, कोर्टात काय काय घडलं?

Video | प्रदीप शर्माला एनआयएकडून अटक, कोर्टात काय काय घडलं?

| Updated on: Jun 17, 2021 | 5:42 PM

सेशन कोर्टामध्ये एनआयच्या वकिलांनी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरुनच मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली असा दावा केला.

मुंबई : एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. एनआयएकडून शर्मांच्या घरावर सकाळी सहा वाजता छापेमारी करण्यात आली. दरम्यान,सेशन कोर्टामध्ये एनआयच्या वकिलांनी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरुनच मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली असा दावा केला. तसेच सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा हे हिरेन यांच्या हत्येचे मास्टरमाईंड आहेत, असेही एनआयएच्या वकिलांनी म्हटलंय.

दरम्यान, लोणावळ्याच्या रिसॉर्टमधून ताब्यात घेतल्यानंतर जे जे रुग्णालयात शर्मा यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर सेशन कोर्टात नेल्यात आलं. त्यानंतर त्यांना 28 जूनपर्यंत NIA कोठडी सुनावण्यात आली आहे.