Pahalgam Terror Attack : एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
NIA Pahalgam Attack Investigation : एनआयएकडून आता पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या तपासाला वेग आलेला आहे. या हल्ल्याच्या प्रत्येक घटनांचा बारकाईने तपास केला जात आहे.
एनआयएकडून आता पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या तपासाला वेग आलेला आहे. एनआयएने घटनास्थळावरून गोळा केलेले नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेले आहेत. तसंच एनआयएकडून सर्व प्रत्यक्षदर्शीकडून जबाब नोंदवण्यास सुरवात झालेले आहे. या हल्ल्यात मारले गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबाचे देखील जबाब नोंदवून घेतले जात आहेत. एनआयएने बैसरन खोऱ्याच्या पाच किलोमीटरच्या परिसरात उपस्थित असलेल्या लोकांची यादी तयार केली असून त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्याचबरोबर बैसरन खोऱ्यात येण्याचे आणि जाण्याचे सगळे मार्ग हे बारकाईने तपासले जात आहेत.
Published on: Apr 27, 2025 05:51 PM
Latest Videos