राज्यात नाईट कर्फ्यूचा विचार, 700मेट्रीक टन ऑक्सिजन लागल्यास पूर्ण लॉकडाऊन :राजेश टोपे
राज्यात 15 ते 18 वयोगटातील 60 लाख मुलांचं लसीकरण करायचं असून हे दररोज तीन लाख प्रमाणं 20 दिवसात होऊन जाईल, असं राजेश टोपे म्हणाले.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी वाढत्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्यांसंदर्भात टीव्ही 9 मराठीशी संपर्क साधला. राज्यात 15 ते 18 वयोगटातील 60 लाख मुलांचं लसीकरण करायचं असून हे दररोज तीन लाख प्रमाणं 20 दिवसात होऊन जाईल, असं राजेश टोपे म्हणाले. 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण वेगानं करत आहोत. राज्यातील 60 लाख मुलांचं लसीकरण करायचं आहे. दररोज 3 लाख मुलांचं लसीकरण याप्रमाणं प्रयत्न करत आहोत. 15 ते 20 दिवसांमध्ये हे लसीकरण होऊन जाईल. किशोरवयीन मुलांना स्वत: सुरक्षित राहायचं असेल तर कुठं जायचं असेल तर लसीकरण करुन घ्या. बर्गर आणि पिझ्झा घ्यायचा असला तरी लस बंधनकारक त्यामुळं लसीकरण करुन घ्या, असं आवाहन राजेश टोपे यांनी किशोरवयीन मुलांना केलं.
Latest Videos