Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या निकाहनाम्याचं प्रकरण नेमकं काय ?
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा ट्विट केला होता. आता ज्यांनी समीर वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी यांचा निकाह लावला ते मौलाना मुज्जमिल अहमद समोर आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा ट्विट केला होता. आता ज्यांनी समीर वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी यांचा निकाह लावला ते मौलाना मुज्जमिल अहमद समोर आले आहेत. टीव्ही नेटवर्कच्या रिपोर्टरनं निकाहनामा दाखवला असता मौलाना मुज्जमिल अहमद यांनी तो निकाहनामा खरा असल्याचं सांगितलं आणि त्यांनी त्या निकाहनाम्यावरील सही माझीचं असल्याच सांगितलं आहे.
समीर आणि शबाना हे दोन्ही मुस्लीम असल्याचं सांगितलं गेलं त्यामुळं काझीनं निकाह लावला. जर दोन्हीपैकी एकजण मुस्लीम नसते तर त्यांचा निकाह झाला नसता. समीर वानखेडे आणि ज्ञानदेव वानखे़डे हे मुस्लीम होते त्यामुळे त्यांचा निकाह झाला. टीव्ही नेटवर्कच्या रिपोर्टरनं निकाहनामा दाखवला असता मौलाना मुज्जमिल अहमद यांनी तो निकाहनामा खरा असल्याचं सांगितलं आणि त्यांनी त्या निकाहनाम्यावरील सही माझीचं असल्याच सांगितलं आहे. समीरच्या लग्नावेळी सर्वजण मुस्लीम असल्याचं सांगण्यात आलं होतं. समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नावेळचा फोटो दाखवला असता तो देखील खरा असल्याचं मौलाना म्हणाले.