शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणारा निखिल भामरे भाजपच्या सोशल मिडिया सेलच्या सहसंयोजकपदी

शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणारा निखिल भामरे भाजपच्या सोशल मिडिया सेलच्या सहसंयोजकपदी

| Updated on: Aug 04, 2023 | 2:09 PM

VIDEO | महाविकास आघाडीच्या काळात शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरेला भाजपचं पद

नाशिक, ४ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट करणारा नाशिकच्या सटाणा येथील निखिल भामरे आता भाजपचा पदाधिकारी झाल्याचे समोर आले आहे. भाजपकडून सोशल मीडिया सेलच्या 21 पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये निखित भामरे याचंही आहे. यामध्ये 1 संयोजक आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे 5 सह संयोजक आहेत, त्यामध्ये निखिल भामरेची वर्णी लागली आहे. मे 2022 मध्ये शरद पवारांविषयी निखिल याने आक्षेपार्ह पोस्ट लागली होती, त्यावेळी त्याचा संबंध भाजपशी जोडण्यात आला होता. मात्र भाजपने पूर्णतः नकार दिला होता. मात्र आता त्याच्यावरच आता ही नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे ही जबाबदारी तो कशी पेलणार याकडे आता साऱ्यांचे लक्ष आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात निखिल भामरेवरती दिंडोरी, पुणे, बारामती, ठाणे, कळवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी सात गुन्हे दाखल झाले होते. आणि तो 50 दिवस तुरुंगातही असल्याची माहिती मिळत आहे. तर निखिल भामरेच्या पद नियुक्तीने वादाला नवं तोंड फुटणार असल्याचे म्हटले जात आहे.

Published on: Aug 04, 2023 02:08 PM