“निलमताई शिवसेनेच्या विचाराच्या नव्हत्या, पण..”; उद्धव ठाकरेंनी सांगितला किस्सा
मातोश्रीवर निलम गोऱ्हेंच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. उद्धव ठाकरेंच्या हस्ते हे प्रकाशन झालं आणि तेव्हा पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी हा किस्सा सांगितला.
“निलमताई या काही शिवसेनेच्या विचाराच्या नव्हत्या. एक सामाजिक कार्यकर्ती, चळवळीतील कार्यकर्ती अशी त्यांची ओळख होती. एके दिवशी मला निरोप आला की निलमताईंना भेटायचं आहे. एक-दोन अडीच तास त्यांनी मला विविध प्रश्नांनी भंडावून सोडलं होतं. पण त्यांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर मी दिलं नाही, असं झालं नाही. त्याचा परिणाम असा झाला की दुसऱ्या दिवशी मला निलमताईंचा फोन आला की मला शिवसेनेत प्रवेश करायचा आहे. तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्यावर एकही प्रश्न मी सोपवला असेन आणि त्यांनी तो अर्धवट सोडला असं कधी झालं नाही”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. मातोश्रीवर निलम गोऱ्हेंच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. उद्धव ठाकरेंच्या हस्ते हे प्रकाशन झालं आणि तेव्हा पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी हा किस्सा सांगितला.
Latest Videos