महायुतीच्या धर्मात पुन्हा कुरकुर, निलेश लंके अन् राम शिंदे यांची एकजूट? तर..
tv9 Marathi Special Report | रोहित पवारांनी भाजपच्या राम शिंदेंचा पराभव केला. मात्र या पराभवाला विखे कुटुंबिय जबाबदार असल्याचा आरोप करत राम शिंदेंनी वरिष्ठांकडे तक्रारीही केल्या, त्यात यंदा लोकसभेत राम शिंदे आणि निलेश लंकेंनी मिळून सुजय विखेंना शह देणार?
मुंबई, २६ ऑक्टोबर २०२३ | महायुतीमध्ये अजित पवार सामील झाले असले तरी नगर जिल्ह्यामध्ये महायुतीच्या धर्मात पुन्हा कुरकुर सुरु झाली आहे. याआधीच भाजपचे नगरचे खासदार सुजय विखे पाटील आणि भाजपचे आमदार राम शिंदेंमध्ये वाद आहेत. तोच आता अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आणि राम शिंदेंनी मोहटादेवीच एकत्रित दर्शन घेतल्यानं नवी चर्चा होतेय. अजित पवार गटाचे निलेश लंके आणि भाजपचे राम शिंदेंनी एकाच गाडीतून प्रवास केला. आता अजित पवार आणि भाजप सत्तेत असले तरी निलेश लंकेंना सुद्धा नगर लोकसभेतून लढण्याची इच्छा आहे. दुसरीकडे सुजय विखे पुन्हा भाजपकडून लोकसभेची तयारी करतायत. गेल्या निवडणुकीत कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी भाजपच्या राम शिंदेंचा पराभव केला. मात्र या पराभवाला विखे कुटुंबिय जबाबदार असल्याचा आरोप करत राम शिंदेंनी वरिष्ठांकडे तक्रारीही केल्या होत्या. त्यात यंदा लोकसभेत राम शिंदे आणि निलेश लंकेंनी मिळून सुजय विखेंना शह देण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट