निलेश राणे यांच्यावर सिंधुदुर्ग कोर्टासमोर पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल

निलेश राणे यांच्यावर सिंधुदुर्ग कोर्टासमोर पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल

| Updated on: Feb 02, 2022 | 11:00 AM

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने (Court) जामीन नाकारला आहे. नितेश राणे यांना जामीन नाकारताच पोलिसांनी (police) त्यांना अडवलं. त्यामुळे भाजप नेते निलेश राणे आणि पोलिसांमध्ये एकच शाब्दिक चकमक उडाली.

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने (Court) जामीन नाकारला आहे. नितेश राणे यांना जामीन नाकारताच पोलिसांनी (police) त्यांना अडवलं. त्यामुळे भाजप नेते निलेश राणे आणि पोलिसांमध्ये एकच शाब्दिक चकमक उडाली. आमची गाडी का अडवली? कोणत्या अधिकारात अडवली? तुमच्याकडे कोणती ऑर्डर आहे का? तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका?, आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही अवमान केला नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती करत निलेश राणे यांनी पोलिसांना धारेवर धरले. यावेळी पोलीस आणि निलेश राणे यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे समर्थकांनाही स्फूरण चढले. राणे समर्थकही जोरजोरात घोषणाबाजी करत पोलिसांना नडताना दिसले. त्यामुळे सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने कोर्टाबाहेर पोलिसांची अधिक कुमक मागवण्यात आली होती.

Published on: Feb 02, 2022 11:00 AM