उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसारखे बोलावे, फडणवीसांकडून ट्रेनिंग घ्यावी
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसारखं बोललं पाहिजे. तुम्ही यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्या. कारण तुम्ही नारायण राणेंकडून ट्रेनिंग घेणार नाहीत, असं निलेश राणे म्हणाले.
मुख्यमंत्री काय बोलतात हे कळत नाही. त्यांचे बोलणे समजण्यासाठी ट्रान्सलेटर लागतो. 25 वर्षे स्वर्गीय बाळासाहेबांनी सेना-भाजप युती जपली, उद्धव ठाकरे यांनी नाही. सेनेचे भाजपवर आणि भाजपचे सेनेवर प्रेम होते. यात उद्धव ठाकरे कुठेच नव्हते. त्यामुळे त्यांना युतीवर भाष्य करण्याचा अधिकार काय? असा सवाल निलेश राणेंनी केलाय. 1995 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या हातात कॅमेराच होता, ते जंगलात फिरत होते. भाजपशी उद्धव ठाकरे यांचा काय संबंध. तुटलं काय किंवा जुळलं काय. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसारखं बोललं पाहिजे. तुम्ही यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्या. कारण तुम्ही नारायण राणेंकडून ट्रेनिंग घेणार नाहीत. त्यानंतर बोलायला शिका आणि मग कुणी 25 वर्षे अंडी उबवली त्यावर भाष्य करा. 2024 मध्ये महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला अंडी उबवण्यासाठी ठेवलंय हे कळेल, असा जोरदार टोला निलेश राणेंनी लगावलाय.