ठाकरे यांच्या मातोश्रीबाहेर घातपाताचा डाव? जिहादांचे लाडके झालेले ठाकरेंना कोण मारणार? कुणाची जहरी टीका
मुंबई गुजरात ट्रेननं प्रवास करणाऱ्या ४ ते ५ जणांचं संभाषण ऐकून एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना फोन केला. उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे, अशी माहिती या व्यक्तीने पोलिसांना दिली. या फोन नंतर पोलीस सतर्क झालेत तर यावरून राजकारण मात्र चांगलंच तापलंय
मुंबई, १६ जानेवारी २०२४ : मातोश्रीबाहेर घातपाताचा डाव असल्याचा फोन कॉल पोलिसांना आला आणि त्यानंतर पोलिसांचा तपास सुरू झालाय. तर दुसरीकडे संजय राऊत आणि नितेश राणे आमने-सामने आलेत. दरम्यान, मुंबई गुजरात ट्रेननं प्रवास करणाऱ्या ४ ते ५ जणांचं संभाषण ऐकून एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना फोन केला. उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे, अशी माहिती या व्यक्तीने पोलिसांना दिली. या फोन नंतर पोलीस सतर्क झालेत तर यावरून राजकारण मात्र चांगलंच तापलंय. संजय राऊत यांनी गेल्या वर्षी ठाकरेंच्या सुरक्षेतील काही जवान कमी करण्यावर बोट ठेवलंय. तर संजय शिरसाट आणि नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या माणसानीच बनावट कॉल केला असल्याची टीका करत सवाल उपस्थित केला. बघा कुणी काय केली जहरी टीका?
Published on: Jan 16, 2024 11:10 AM
Latest Videos