Special Report | नितेश राणेंना जेल की बेल; उद्या न्यायालयाचा निकाल
संतोष परब हल्लाप्रकरणी अटकेत असलेले नितेश राणे यांच्या जामीनावर उद्या निकाल आहे. मात्र त्याआधीच राज्यातील राजकीय वातावरण मात्र तापले आहे.
मुंबईःसंतोष परब हल्लाप्रकरणी अटकेत असलेले नितेश राणे यांच्या जामीनावर उद्या निकाल आहे. मात्र त्याआधीच राज्यातील राजकीय वातावरण मात्र तापले आहे. नितेश राणे यांच्या अटकेवरून भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राणेंचा हिशोब चुकता करू असं थेट आव्हान दिले आहे. राजकीय वातावरण सगळं गरम झालं असली तरी आता उद्याच नितेश राणे यांना जेल की बेल ठरणार आहे. नितेश राणे यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना कोल्हापुरात आणण्यात आले होते. आता राजकीय पक्षांसह सगळ्यांचे लक्ष न्यायालयाच्या उद्याच्या निकालाकडे लागले आहे. नितेश राणेंना उद्या बेल मिळणार की जेल होणार हे आता निकालानंतरच समजणार आहे.
Latest Videos