‘युतीत ठाकरे यांचा रुबाब, तर संजय राऊत मविआमधील शकुनी मामा’, नितेश राणे पुन्हा गरजले
सिंधुदुर्ग : सिल्व्हर ओकमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. त्याचे फोटो व्हायरल झालेत. बाळासाहेब ठाकरे यांचा एक वेगळा रुबाब होता. मोठ्यातला मोठा नेता,कलाकार मातोश्रीवर यायचा. बाळासाहेब ठाकरे यांना नमस्कार करायचा आणि मगच मुंबईत यायचा.पण काल उद्धव ठाकरे यांना जी वागणूक मिळाली त्यावर त्यांनी विचार करावा.भाजपसोबत युतीत असताना उद्धव ठाकरेंना जो मान होता. तो काल दिसला नाही.उद्धव […]
सिंधुदुर्ग : सिल्व्हर ओकमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. त्याचे फोटो व्हायरल झालेत. बाळासाहेब ठाकरे यांचा एक वेगळा रुबाब होता. मोठ्यातला मोठा नेता,कलाकार मातोश्रीवर यायचा. बाळासाहेब ठाकरे यांना नमस्कार करायचा आणि मगच मुंबईत यायचा.पण काल उद्धव ठाकरे यांना जी वागणूक मिळाली त्यावर त्यांनी विचार करावा.भाजपसोबत युतीत असताना उद्धव ठाकरेंना जो मान होता. तो काल दिसला नाही.उद्धव ठाकरेंची अवस्था मुख्य खुर्चीवरून सोफ्यावर आली.संजय राऊत यांच्यासारख्या लोकांच्या नादी लागलात तुमची अवस्था काय झाली बघा. सोफ्यावरून तुम्ही स्टूलवर याल अशी आम्हाला भीती वाटत आहे.
कर्नाटक निवडणुकीवरून संजय राऊत यांनी काँग्रेसची इज्जत काढली.एकट्या काँग्रेसचा हा विजय नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत शकुनी मामा,नारदमुनींच काम करतायत. हा अपमान नाना पटोले यांना मान्य आहे का?कर्नाटकमध्ये कोण जिंकले हा प्रश्न पडतोय. पाकिस्तानचा हा विजय आहे का? पाकिस्तानचं राज्य कर्नाटकमध्ये आलंय ही भीती निर्माण करायची आहे का?हिरवे झेंडे फडकवले गेले यावर बाळासाहेब ठाकरेंनी काय लिहिलं असतं याचा विचार राऊत यांनी करावा.
उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात झालेल्या दोन दंगलींविषयी भाष्य करायला हवं होतं. उलट ते गृहमंत्र्यांवर टीका करत आहेत.मी जी माहिती दिली 13 ऑगस्ट 2004ला जी बैठक झाली त्या बैठकीत शिवसेनेचे खासदार जेष्ठ नेते होते.2004ची दंगल घडविण्यात उद्धव ठाकरेंचा हात होता का? याची चौकशी पोलिसांनी करावी,त्यांची नार्को टेस्ट करावी. हवी असल्यास माझी, त्या खासदारांची चौकशी करा, परत एकदा 2024 मध्ये दंगल घडवण्याचा प्लान आहे का ?, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.