सरकारचा नेता, पालकमंत्री, मंत्री, मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी संपाकडे फिरकला नाही, नितेश राणेंचा टोला
तुम्हाला एवढे दिवस इथं बसवलं आहे. एक तरी आमदार, पालकमंत्री, मंत्री,मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी इथं येत नाही, असं नितेश राणे म्हणाले.
भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईतल्या आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलानात सहभाग घेतला. महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी हे एकटे नाहीत हे सांगण्यासाठी आलोयं, भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहे, असं नितेश राणे म्हणाले. सदाभाऊ खोत यांना फार मच्छर चावतात असा इंटरव्यू चालवला. सदाभाऊ खोतांना मला सांगायचंय दोन तीन मच्छर बाटलीत भरुन द्या, अनिल परब यांच्या घरी ते सोडायचे आहेत. जेणेकरुन मच्छर कसे चावतात हे त्या कारट्याला कळेल, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे. तो मूळ तसा आमच्या सिंधुदुर्गचा आहे, माझ्या मतदारसंघाचा आहे, पण आमच्या मातीतून असा कारटा कसा निघाला हा संशोधनाचा विषय आहे,असं नितेश राणे म्हणाले.
Latest Videos