Special Report : नॉटरिचेबल नितेश राणे पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर, नितेश राणे इतके दिवस होते कुठे?
भाजप आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल झाले आहे, संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंवर अटकेची टांगती तलवार असताना, गेल्या अनेक दिवसांपासून राणे नॉट रिचेबल होते, नितेश राणे कुठे आहेत? असा सवाल सर्वच स्तरातून विचारला जात होता.
भाजप आमदार नितेश राणे (Nitesh rane) सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल झाले आहेत, संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंवर अटकेची टांगती तलवार असताना, गेल्या अनेक दिवसांपासून राणे नॉटरिचेबल होते, नितेश राणे कुठे आहेत? असा सवाल सर्वच स्तरातून विचारला जात होता. आज नितेश राणे दाखल होताच भाजपच्या (Bjp) स्थानिक कार्यकर्तांनी राणेंना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले, त्यांनंतर दमदार अंदाजात राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत प्रवेश केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक झाली, भाजपने मोठा विजय नोंदवला, मात्र तरीरी नितेश राणे अटकेच्या टांगत्या तलवारीमुळे कुणासमोरही आले नव्हते. आता मात्र न्यायलयाने अटकेपासून संरक्षण दिल्याने नितेश राणे तब्बल 15 दिवसांनी समोर आले, राणे इतके दिवस कुठे अज्ञातवासात होते, हे मात्र अजूनही कुणाला कळाले नाही.