Nitesh Rane Video : नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं अन् नक्कल करून उडवली खिल्ली, ‘त्याला आधी कंठ तरी फुटू दे…’
जिहादी मानसिकता असणाऱ्या सर्व कारट्यांना चोप देणार आहे. त्यांना कोणी हिंमत दिली आहे. त्यांची हिंमत तोडण्याचे काम फडणवीस सरकार करणार आहे. समाज कंटकांकडे ट्रकभर दगडे आली कुठून? या सर्वांची चौकशी होणार आहे, असे राणे यांनी सांगितले.
नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. शहरातील अनेक भागात पोलिसांनी कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. अशातच नागपुरातील राड्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजपला महाराष्ट्राला पेटता मणिपूर करायचे आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. या टीकेवर नितेश राणेंनी पलटवार केलाय. यावेळी नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची नक्कल करत खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळले. त्या व्यक्तीला पेटवणे काय हे माहिती नाही. त्यांना आधी कंठ तरी फुटू द्या, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. दरम्यान, नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे हिंसाचार भडकाला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहे, असा आरोप विरोधक करत आहे. त्यावर राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांमध्ये मी आहे. माझे मुख्यमंत्री मला काय बोलणार? त्याची चिंता तू करायची नाही. माझ्या तोंडी कोणी लागू नये, असा टोला नितेश राणे यांना विरोधकांना लगावला. तर नागपूरमध्ये झालेला हिंसाचाराची घटना ही पूर्वनियोजित होती. समाज कंटकांनी पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ले केले आहेत. थेट पोलिसांवर हल्ला केल्यानंतर सरकार म्हणून आम्ही शांत राहणार का? पाकिस्तानमधील अब्बांची आठवण कराल, अशी कारवाई आता होणार असल्याचा इशाराही राणेंनी दिला.