माझी क्लिप सेव्ह करा, आदित्य ठाकरे यांची दिवाळी आर्थर रोड जेलमध्ये असेल, भाजप नेत्याचा मोठा दावा

“माझी क्लिप सेव्ह करा, आदित्य ठाकरे यांची दिवाळी आर्थर रोड जेलमध्ये असेल”, भाजप नेत्याचा मोठा दावा

| Updated on: Jul 16, 2023 | 8:49 AM

भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, आदित्य ठाकरे यांची येणारी दिवाळी आर्थर रोड जेलमध्ये असतील. नितेश राणे यांच्या विधानाने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

पंढरपुर : भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “आदित्य ठाकरे यांची येणारी दिवाळी आर्थर रोड जेलमध्ये असतील. ही माझी क्लिप सेव्ह करून ठेवा तिथे ते नाईटलाईफ साजरी करताना दिसतील. त्यांना महिलांच्या जेलमधे टाकणार की पुरुषांच्या जेलमध्ये पाहावे लागेल.” नितेश राणे यांनी “अजितदादांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या विचाराला समर्थन दिले आहे. त्यामुळं ते आमच्या हिंदू जनआक्रोश मोर्चात दिसतील. तसेच अजित पवार हे समान नागरी कायद्यासाठी समर्थन करतील, अगदी अयोध्येला महाआरती देखील करतील,” असं वक्तव्य केलं.

Published on: Jul 16, 2023 08:49 AM