भाजप कुबड्यांचा आधार घेतलेला पक्ष, संजय राऊत यांचा वार; नितेश राणे यांचा पलटवार काय?

भाजप कुबड्यांचा आधार घेतलेला पक्ष, संजय राऊत यांचा वार; नितेश राणे यांचा पलटवार काय?

| Updated on: Dec 25, 2023 | 4:09 PM

भाजप हा हवेतील पक्ष तो जमिनीवरचा पक्ष नाही. भाजप कुबड्यांचा आधार घेतलेला पक्ष, संजय राऊत यांचा भाजपवर सडकून हल्लाबोल तर त्यांनी ४० जागा जिंकण्याची भाषा करणं हे हास्यास्पद आहे. तुम्ही स्वतःच्या ताकदीवर बोला, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मुंबई, २५ डिसेंबर २०२३ : भाजप हा हवेतील पक्ष तो जमिनीवरचा पक्ष नाही. मिंधे आणि अजित पवार गट हे दोन गट कुबड्यांवर उभे आहेत. त्यांनी ४० जागा जिंकण्याची भाषा करणं हे हास्यास्पद आहे. तुम्ही स्वतःच्या ताकदीवर बोला, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. यावर भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी पटलवार केला आहे. २०१९ ला तुझा मालक उद्धव ठाकरे हा स्वतःच्या ताकदीवर मुख्यमंत्री म्हणून बसला काय? १५० पेक्षा जास्त आमदार त्याने स्वतःच्या ताकदीवर निवडून आणले? आत्ता हल्ली झालेल्या धारावी मोर्चा तुझ्या मालकाला किती कुबड्या घ्याव्या लागल्या? असे एक न् अनेक सवाल करत नितेश राणेंनी हल्लाबोल केलाय. तर एक काळ असा होता हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने लाखोंचे मोर्चे काढले होते. स्वतःच्या जोरावर मोर्चे काढले. आज तुझ्या मालकाला दोन सोड किती कुबड्या घ्याव्या लागतात हे जरा धारावीच्या निमित्ताने आठव. मगच तुझं थोबाड उघड, असा जिव्हारी लागणारा पलटवार नितेश राणे यांनी केलाय.

Published on: Dec 25, 2023 04:09 PM