संजय राऊत चायनीज मॉडेल, त्यांना फक्त निवडणुकीत राम आठवतो; नितेश राणे यांच्याकडून खरपूस समाचार
रामलल्ला काय भाजपची प्रॉपर्टी आहे का? असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी करत भाजपवर सडकून टीका केली आहे. तर अयोध्येच्या सातबारावर भाजपचे नाव आहे का? अशी खोचक टीकाही त्यांनी केली केली. यावर भाजप नेते नितेश राणेंचं भाष्य काय?
मुंबई, २५ डिसेंबर २०२३ : रामलल्ला काय भाजपची प्रॉपर्टी आहे का? असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी करत भाजपवर सडकून टीका केली आहे. तर अयोध्येच्या सातबारावर भाजपचे नाव आहे का? अशी खोचक टीकाही त्यांनी केली केली. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. प्रभू राम हे भाजपची प्रॉपर्टी असल्याच्या टीकेवर नितेश राणे म्हणाले, रामलल्लावर कडवट हिंदूंचा अधिकार आहे. अयोध्येत जिथे राम मंदिर उभे राहत आहे. तिथल्या सातबारावर समस्त हिंदू समाजाचे नाव आहे. तुझ्यासारख्या धर्मांतर झालेल्या लव्ह जिहाद झालेल्या दाढी कुरवाळत बसलेल्यांचं नाव नाही, असे म्हणत सडकून टीका नारायण राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तर तुझ्यासारखे चायनीज मॉडेल ज्यांना रामाची आठवण फक्त निवडणुकीच्या निमित्ताने येते. 2019 ला तुझ्या मालकाची घोषणा आठव, पहिले मंदिर फिर सरकार आणि आता मंदिराचे नाव घेतले तरी १० जनपथ वर बसलेली तुझी मम्मी कशी कान कुरळेल ते कळेल, असा हल्लाबोलही नितेश राणे यांनी केला.