नितीन गडकरी धमकी प्रकरणात मोठी अपडेट, बेळगावातील आरोपीकडून ‘हे’ साहित्य जप्त!
VIDEO | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमकीमागे कर्नाटक कनेक्शन?
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या आरोपी जयेश पुजारीकडून धमकी देण्यात आलेला मोबाईल आणि सीमकार्ड जप्त करण्यात आला आहे. बेळगाव जेलमधून आरोपी जयेश पुजारा याच्याकडून दोन मोबाईल, दोन सीम कार्ड जप्त केले असून त्यातील रेकॉर्डस तपासले जात आहेत. काल नागपूर पोलीस कर्नाटकात दाखल झाले. त्यांनी बेळगाव जेलची पूर्ण झाडाझडती घेतली. तसेच फोन केलेली व्यक्ती जयेश पुजारा याचा जबाबदेखील नोंदवण्यात आलाय. आता जयेश पुजाराला नागपुरात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी टीव्ही 9 मराठीशी याविषयावर संवाद साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिलेले फोन आणि सीमकार्ड जप्त बेळगाव येथून जप्त करण्यात आले आहेत. जानेवारी महिन्यातील धमकी आणि दोन दिवसांपूर्वी दिलेल्या धमकीचे फोन- सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.