‘मोदी आणि माझ्यात वाद नाही’; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 'टीव्ही9 मराठी'ला 'रोखठोक' या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. 'टीव्ही9 मराठी'चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्यात कोणताही वाद नाही. विरोधकांकडून आमच्यात वाद असल्याचा प्रचार केला जातो. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत माझे खूप चांगले संबंध आहेत, असे भाजपचे नागपूर लोकसभेचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. मोदी आणि आमच्यात कुठलाही वाद नाही. काही पत्रकार मोदींवर थेट टीका करायला घाबरतात, ते माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून लिहितात. कुणीतरी एक चुकीचं लिहितो, त्यानंतर तुम्ही सगळे लोक उचलून त्याच्या स्टोऱ्या करतात. मोदींचा आणि माझा उत्तम संवाद आहे. कुठल्याही प्रकारची अडचण नाही. कारण नसताना आधारहीन बातम्यांचा मनस्ताप होतो, असेही नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर मननोकळेपणाने भाष्य केले.
Published on: Mar 27, 2024 10:42 PM
Latest Videos