भाजपमध्ये नितीन गडकरी यांची घुसमट?, ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
VIDEO | नितीन गडकरी यांना भाजपमध्ये साईडलाईन केलंय? ठाकरे गटाच्या नेत्यानं काय केला खळबळजनक दावा?
नागपूर : केंद्र सरकारच्या दबावाखाली शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय झाला, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तसेच निवडणूक आयोगाने आमच्यासोबत धोका केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे तर, आम्ही एनडीए सरकारमध्ये होतो तेव्हा मोदी पंतप्रधान होते. तेव्हा भाजपच्या एकाही मंत्र्यांना काम करण्याचा अधिकार नव्हता, असेही खैरे यांनी म्हटले आहे. नितीन गडकरी हे चांगलं काम करत होते मात्र त्यांना करू दिले जात नाही. नितीन गडकरी यांना काही काम सांगितलं तर ते करायचे. त्यांच्याकडे मी जिल्ह्याचं एक काम घेऊन गेलो होतो. पाच सहा महिन्यानंतर परत लोकसभेत विचारलं कामाचं काय झालं? काम सुरू झालं नव्हतं. त्यावर गडकरी यांचं एक वाक्य होतं. ते मी बोलू शकत नाही. इतकं त्यांना भाजपमध्ये साईड लाईन केलं होतं. गडकरींना साईडलाईन करून आमच्या मराठवाड्याचं नुकसान करण्यात आलं, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला.