Headline | 10 AM | नागरिकांसोबत मग्रुरी खपवून घेतली जाणार नाही : नितीन राऊत
एखादा अधिकारी जर नागरिकांसोबत मग्रूरपणे वागत असेल, तर अशा अधिकाऱ्यांना खपवून घेणार नाही, असा सज्जड दम उर्जामंत्री नितीन राऊतांनी अधिकाऱ्यांना दिला. (Nitin Raut Comment on authorities arrogance will not be tolerated)
“कोरोना काळात नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. पण अशावेळी एखादा अधिकारी नागरिकांसोबत मग्रूरपणे वागत असेल तर त्यांची मग्रुरी खपवून घेतली जाणार नाही,” असा सज्जड दम उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मराठवाड्यात ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. यावेळी बीडमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान बीड, परभणी येथे ऑक्सिजन प्लांट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. या प्लांटचे काम व्यवस्थित सुरू आहे की नाही हे पाहण्यासाठी मी हा दौरा केला. अनेक समस्या असतात. पण या समस्यांचे निराकरण जितक्या चांगल्या पद्धतीने करता येईल, तो करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे नितीन राऊत म्हणाले.Nitin Raut Comment on authorities arrogance will not be tolerated
Latest Videos