AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitish Kumar : पंतप्रधान पदावरून पुन्हा नितीश कुमारांचं मोठं वक्तव्य, काय म्हणाले ऐका....

Nitish Kumar : पंतप्रधान पदावरून पुन्हा नितीश कुमारांचं मोठं वक्तव्य, काय म्हणाले ऐका….

| Updated on: Sep 07, 2022 | 6:54 PM

आपसात विचार करून नेता निवडू.आवश्यकता पडल्यास सर्व एकत्र बसू. पण, मला पंतप्रधान पदाचा उमेदवार व्हायचं नाही, असंही नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं.

नवी दिल्ली :बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएपासून फारकत घेतली. बिहारमध्ये भाजपची साथ सोडून इतर सात पक्षांची एकता झाली. त्यातून त्यांनी पुन्हा सत्ता स्थापन केली. 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान पदाचा दावेदार मी नसल्याचं आज त्यांनी स्पष्ट केलं. भाजपच्या विरोधात वेगवेगळ्या पक्षांना एकत्र करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असं त्यांनी सांगितलं. राज्यांच्या विकासासाठी भाजप विरोधातील बहुतक सर्व पक्ष एकत्र आले. वेगवेगळ्या पक्षांशी बोलणं सुरू आहे. देशाच्या विकासासाठी विचार करत आहोत. सर्व मिळून देशाच्या हिताचं काम करू. आपसात विचार करून नेता निवडू.आवश्यकता पडल्यास सर्व एकत्र बसू. पण, मला पंतप्रधान पदाचा उमेदवार व्हायचा नाही, असंही नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं.

Published on: Sep 07, 2022 06:53 PM