निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून कोणी आमच्या आमदारांशी संपर्क नाही केला- असदुद्दीन ओवैसी
राज्यसभेसाठी आमच्याशी कोणीही चर्चा केली नाही. राज्यसभेला कुणाला आमचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी आम्हाला जगजाहीर पाठिंबा मागावा. आम्ही पाठिंबा देऊ, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.
राज्यसभा निवडणुकीला अवघे तीन दिवस बाकी आहेत. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी हे महाराष्ट्रात आले आहेत. आता ते नांदेडमध्ये असून संध्याकाळी लातूर येथील एका सभेला संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी ओवैसी यांनी मीडियाशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधला नाही. राज्यसभेसाठी आमच्याशी कोणीही चर्चा केली नाही. राज्यसभेला कुणाला आमचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी आम्हाला जगजाहीर पाठिंबा मागावा. आम्ही पाठिंबा देऊ, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीकडून कोणीही आमच्या आमदारांशी संपर्क केला नाही. त्यांना आमची गरज असेल तर आम्हांला संपर्क करा. नाही तर काही गरज नाही. आम्ही आमच्या आमदारांशी बोलत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
Published on: Jun 07, 2022 12:40 PM
Latest Videos